दिवाळी विशेष: दिवाळी उत्सवाला उद्यापासून होणार सुरुवात , वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाचा सर्वत्र उत्साह

Foto
उज्ज्वला साळुंके

छत्रपती संभाजीनगर: दिवाळी सणाचा घरोघरी मोठा उत्साह आहे. वसुबारसपासून दिवे लावून घरोघरी दिवाळी सणाला सुरुवात केली जाते. ही परंपरा यंदाही कायम ठेवली जाणार असून उद्या वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. उद्या (दि.17) अश्‍विन वद्य एकादशी (रमा एकादशी) निमित्ताने घरोघरी वसुबारस निमित्ताने पूजन केले जाणार असल्याची माहिती वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.
दिपोत्सवाच्या प्रारंभी येणारी एकादशी म्हणजे रमा एकादशी. रमा म्हणजे लक्ष्मी. समुद्र मंथनातून पहिले रत्न निघाले ते म्हणजे लक्ष्मी. म्हणूनच कार्तिक स्नानानंतर लक्ष्मीची पूजा करुन उपवास केला जातो. या दिवशी विष्णुंना प्रिय अशा तुळशीला प्रदक्षिणा घालतात. या एकादशी पूजनाने सुखाच्या आड येणाऱ्या भावना विनाशासाठी प्रार्थना केली जाते. पापक्षालन करणारी इच्छा पूर्ती करणारी ही रमा एकादशी म्हणजे श्री विष्णु आणि लक्ष्मीच्या पूजेचे व्रत. वसुबारस (गोवत्सद्वादशी), समुद्र मंथनातून नंदा नावाची कामधेनू गाय निघाली. यादिवशी वासरू असलेली गाय (सवत्स गाय) यांची पूजा करून नैवेद्य दाखवून अर्पण केला जातो.

धनत्रयोदशी आणि नर्क चतुर्दशीचे महत्व

येत्या शनिवारी (दि. 18) धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी या दिवशी विशेषतः आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजन केले जाते. सर्वांना उत्तम आरोग्य लाभाव याकरिता भगवान धन्वंतरीचे विशेष असे पूजन केले जाते. या दिवशी प्रामुख्याने वैद्य म्हणजेच डॉक्टर देखील आपल्या सर्व उपकरणाचे व धन्वंतरीची पूजन करतात त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही धन आहे. त्या धन- धान्याचे देखील पूजन केले जाते. घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहावे. याकरिता दक्षिण दिशेला यमाच्या नावाने कणकीच्या दिवा मध्ये हळद घालून दिवा बनवावा व त्यामध्ये तेल वात धने घालून दिवा लावावा याला दीपदान असे म्हणतात. तसेच 20 ऑक्टोबर रोजी अभंग स्नान नर्क चतुर्दशी आहे. याची आख्यायिका पाहिली तर नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्णांनी 1108 स्त्रियांना मुक्त केले. तो दिवस म्हणजे नरका चतुर्दशी अभ्यंग स्नान करते. वेळेस शास्त्राच्या मान्यतेनुसार हिवाळ्याचा आरंभ होत असतो आणि या हिवाळ्यामध्ये शरीर उष्ण रहावे रूक्ष राहू नये म्हणून पूर्ण शरीराला तेल लावावे. याला तैल अभ्यंग असे म्हणतात. स्नान करते वेळेस प्रामुख्याने पाण्यामध्ये आघाड्याची पानं जटामासी विविध प्रकारच्या औषधी थोडासा कापूर सुगंधित द्रव्ययुक्त पाण्याने स्नान करावे.

लक्ष्मी पूजनाला अंत्यत महत्व: अनंत पांडव गुरुजी

21  ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. दुपारी 5: 55 पर्यंत म्हणजेच त्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या आहे आणि प्रतिपदा वृद्धी तिथी आहे. म्हणून धर्मसिंधुतील पूर्वत्रैवव्याप्तिरितीपक्षे परत्रयामत्रयाधिकव्यापिदर्शापेक्षया प्रतिपद्‍ वृद्धिसत्त्वे लक्ष्मीपूजादिकमपि परत्रैवेत्युक्तम्‌‍‍ या वचनानुसार लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर रोजी शास्त्रसंमत आहे. लक्ष्मी कुबेर पूजन दिवाळीच्या अमावस्येच्या पर्वकाळावर लक्ष्मी कुबेर पूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पूजनाने अलक्ष्मीची विसर्जन होऊन दशविध गजांत लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते या दीपावलीच्या पर्व काळामध्ये दीपोत्सव केला जातो. दिव्यामध्ये जे आपण तिळाचे तेल किंवा जे आपण वापरत असेल ते तेल तूप हे दिवे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाते. तसेच 22 ला बलिप्रतिपदा आहे. बलिप्रतिपदा भगवान महाविष्णुने वामन अवतारामध्ये बळीराजाचा उद्धार केला तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या ग्रुप बांधवासह गोवर्धन पर्वताची पूजन केले. तसेच बलिप्रतिपदीच्या दिवशी अन्नकूट पर्वताचे देखील पूजन केले जाते आणि विशेष म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी हा बलिप्रतिपदा म्हणजेच अर्ध मुहूर्त मानला गेला आहे. असेही वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी स्पष्ट केले.